गावी जाण्यासाठी उपाशी पोटी 300 किमी चालला, 21 वर्षाच्या मजुराचा वाटेतच मृत्यू

गावी जाण्यासाठी उपाशी पोटी 300 किमी चालला,  21 वर्षाच्या मजुराचा वाटेतच मृत्यू

लॉकडाऊननंतर 1000 किमी दूर असलेल्या घराकडे जाण्यासाठी त्यांनी पायी प्रवास सुरू केला. मात्र उपाशी पोटी चालल्यानंतर 300 किमी अंतरावरच त्याला मृत्यूने गाठलं.

  • Share this:

हैदराबाद, 13 मे : लॉकडाऊनच्या काळात सर्व काम बंद असल्यानं हातावर पोट असलेल्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. कामाच्या ठिकाणी हाती पैसे नसल्यानं खायला काहीच नाही. अशा परिस्थितीत मजुर शेकडो ते हजारो मैलांचा प्रवास पायी करून घर गाठण्याची धडपड करत आहेत. मात्र यामध्ये घरी पोहोचण्याआधीच अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तेलंगणातील भद्राचलम इथं कडक उन्हाच्या त्रासामुळे एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादमधून त्याच्या सहकाऱ्यांसह ओडिसाला जाण्यासाठी 21 वर्षीय मजुर निघाला होता. रविवारी ते हैदराबादमधून निघाले. त्यानंतर दिवस रात्र चालतच राहिले. कडक उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. जवळपास 300 किमी अंतर पार केल्यानंतर ते भद्राचलम इथं पोहोचले.

मंगळवारी जेव्हा ते भद्राचलम इथं पोहोचले तेव्हा 21 वर्षाच्या तरुणाच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्याला उल्टीही झाली आणि रस्त्यावरच पडला. तेव्हा सहकारी मजुरांनी त्याला भद्राचलम रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात पोहोचण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता.

पाहा VIDEO : थांबला तो संपला! या युवकाच्या जिद्दीसमोर हरण्याचं दु:खही विसरून जाल

डॉक्टरांनी सांगितलं की, मजुराचा मृतदेह आणि तोंड एकदम सुकलेलं होतं. कडक ऊन आणि गरमीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं.

हे वाचा : खळबळजनक, 3 वर्षांपूर्वी केले लेकावर अंत्यसंस्कार लॉकडाऊनमध्ये अचानक पोहचला घरी

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोहोचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. मृत तरुण ओडिसातील मल्कानगिरी जिल्ह्यात राहत होता.

पाहा VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं आंदोलन

First published: May 13, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या