छतपुरा, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पसरला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे. अनेक कुटुंब विखुरले गेले असतानाचा लॉकडाऊनमध्ये एक खळबळजनक घटना घडली. 3 वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केलेला लेक जिवंत घराच्या दारासमोर अचानक येऊन उभा राहिला. हा संपूर्ण प्रकार काय हे काही मिनिटं कुणाच्याच लक्षात येईना. त्याला पाहून त्याच्या वडिलांचाही विश्वास बसेना. मध्य प्रदेशातील छतपुरा गावात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. तीन वर्षांपूर्वी वी बिजावरच्या मौनासैय्या जंगलात एका माणसाचा सांगाडा सापडला होता. भागोला आदिवासींनी त्यांच्या मुलगा घरी परत न आल्यानं त्याचाच असावा असा अंदाज व्यक्त केला. त्यांनी आपल्या मुलासारख्या दिसणाऱ्या सांगड्यावर 3 वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले होते. हे वाचा- घरी परतताना सोबत नेऊ नका कोरोना! ट्रेन प्रवासात व्हायरसपासून असा बचाव करा कोरोनाच्या महासंकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्यानं वेगवेगळ्या राज्यातील मजूर आपल्या गावी परतत आहेत. आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार आदिवासी पाड्यावर दिल्लीरी गावात युवक आपल्या घऱी पोहोचला. या युवकाला त्याचे कुटुंबीय हैराण झाले. त्यांना कोड उलगडेना. आपल्या मुलाचा मृत्यू झाला असं समजून त्यांनी 3 वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले होते. दारात आपल्या जिवंत लेकराला पाहून वडिलांसह कुटुंबीयांची झोप उडाली. हा गोंधऴ सोडवण्यासाठी वडील या युवकाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्यांनी संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी या प्रकरणी चौकशी केली असून या मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 3 वर्षांपूर्वी हा मुलगा मेला नव्हता असंही पोलिसांनी सांगितलं. कुटुंबीयांनी ज्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार केले तो कोणाचा होता? हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरीतच आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. हे वाचा- औरंगाबादेतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी दोन बळी हे वाचा- एक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं, निःशब्द करणारा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.