विवेक कुलकर्णी, नवी मुंबई 15 सप्टेंबर : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना नवी मुंबईतल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात धक्का बसलाय. या कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आले होते. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाईक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा गढ असलेल्या नवी मुंबईत महिल्यांदाच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आले होते. त्यामुळे गणेश नाईक कार्यक्रमाला हजर होते. मात्र त्यांना व्यासपीठावर न बोलवल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी कार्यक्रमामधून काढता पाय घेतला. गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने ते लवकर बाहेर पडले असं सांगण्यात आलंय.
युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?
व्यासपीठावर नड्डांसोबत भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष संजय लेले, संघटन मंत्री व्ही सतीश, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. तसच माजी खासदार किरीट सोमय्या आणि संघटन मंत्री विजय पुराणिक उपस्थित होते. मात्र ते व्यासपीठावरसमोरच्या मोकळ्या जागेत जमिनीवर बसले. नंतर सोमय्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करण्यात आली मात्र ते व न जाता खालीच जमीनीवर बसले.
गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं.
नड्डा म्हणाले, 370 च्या तरतुदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. 35A हा घटनेच्या मूळ रचनेचा भाग नाही, ते नंतर घालण्यात आलंय. 1954 ला 35 A चा समावेश करण्यात आला यानं जम्मू आणि काश्मीरचा नागरिक कोण हे ठरवण्याचा अधिकार हे जम्मू आणि काश्मीरला ठरवण्याचा अधिकार मिळाला जम्मू आणि काश्मीर मध्ये मंत्रीपदाची शपथ घेताना भारताची नाही तर जम्मू काश्मीरचा उल्लेख केला जात होता असंही ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा