डोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यू

उरणमध्ये टँकरचा एक भीषण अपघात झाला आहे आणि यात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 11:46 AM IST

डोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यू

उरण, 07 ऑगस्ट : उरणमध्ये टँकरचा एक भीषण अपघात झाला आहे आणि यात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. उरण तालुक्यातील भोम गावातीव रहिवासी असलेल्या एका तरूणाचा या अपघातात जीव गेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑईल टँकरच्या खाली डोकं चिरडून या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी हा अपघात झाला आहे.

ऋषण पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी दुपारी जेएनपीटी बंदराजवळ गणेश बन्जो प्रकल्पाच्या गेटसमोर हा अपघात घडला आहे. ऋषण या गेटसमोरून जात असताना ते खाली पडले आणि काही घडताच तिथून जाणारा ऑईल टँकर त्यांच्या डोक्यावरून गेला. या घटनेनंतर टँकर चालकाने तिथून पळ काळला. स्थानिकांनी तात्काळ ऋषणला जवळच्या रुग्णालया त दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नावा-शिवा पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावधान ! मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या, मेलेल्या कोंबड्यांचं

स्थानिकांच्या मदतीने टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या टँकर चालकाचा शोध घेत आहे. खरंतर ऋषण पाटील हा पनवेलला राहणारा आहे. पण मुळचा तो उरणचा आहे. कामानिमित्त तो जेएनपीटी बंदराकडे गेला होता. आणि तिथेच या भीषण अपघातात त्याला मृत्यूने कवटाळलं.

ऋषण याच्या अशा अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. ऋषण पाटील त्यांच्या कुटुंबियांसोबत पनवेलमध्ये राहत होता. तो त्याच्या कामानिमित्त उरणला गेला होता. पण तिथे त्याचा अपघात झाला आणि आज तो आपल्यात नाही आहे याचा त्याच्या कुटुंबियांना विश्वासच नाही बसत आहे.

Loading...

हेही वाचा...

अबू सालेमला करायचंय लग्न, कोर्टाकडे पॅरोलसाठी घेतली धाव

सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी 3 दिवस संपावर

मराठा आंदोलकांवरचे कोणते गुन्हे मागे घेता येतील ?,मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...