मुंबई, 07 ऑगस्ट : मंडळी तुम्ही सहज एखाद्या चायनीज कॉर्नवर चिकन खाण्यासाठी जाता. पण तिथं ताटातले पदार्थ किती चांगले आणि ताजे असतात याची आपण कधी विचारणा नाही करत. पण त्यातूनच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील चायनीज गाड्यांवर मिळणार चिकण हे मेलेल्या कोंबड्यांच असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाने मारलेल्या छाप्यातून निष्पन्न झालं आहे. शिवडी एक झोपडीतुन चालणाऱ्या या धंद्यातुन 40 ते 50 किलो चिकन जप्त करण्यात आलं आहे. या झोपडीत विकत असलेले सगळे पदार्थ हे मेलेल्या कोंबड्यांपासून बनवले जात होते. खरंतर हा गिऱ्हाईकाच्या आरोग्याची आणि त्यांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. या प्रकरणात 1 जनाविरोधात कारवाही करण्यात आली आहे. अबू सालेमला करायचंय लग्न, कोर्टाकडे पॅरोलसाठी घेतली धाव दुपारनंतर मुंबई शहरात चायनीज पदार्थ विकणाऱ्या गाड्या रस्त्यावर लागतात. स्वस्त, मस्त आणि चटकदार म्हणून अनेकांचे पाय या गाड्यांकडे वळतात. पण या ठिकाणी वापरण्यात येणार चिकन हे खाण्यायोग्य असतं का याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का, बसण्याची जागा आणि पदार्थ स्वच्छ जागी बनवले जातात का याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मुंबईत रोज हजारो कोंबड्या मुंबई बाहेरून विक्रीस आणल्या जातात. या दरम्यान ज्या कोंबड्या रोगट असतात त्या मरतात. आणि त्याच कोंबड्या शिवडी येथील एका झोपडपट्टीत विकल्या जातात. तेथे त्या कापून कमी किमतीत म्हणजे 25 ते 30 रुपये किलो ने विकल्या जाते. अन्न आणि औषध प्रशासनाणे कारवाही केली असून या विषजन्न चिकन शरीरास अपायकारक असल्याने अश्या गाड्यांवरील चिकन न खाण्याच आवाहन या विभागान केलं आहे. सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी 3 दिवस संपावर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.