Home /News /news /

अबू सालेमला करायचंय लग्न, कोर्टाकडे पॅरोलसाठी घेतली धाव

अबू सालेमला करायचंय लग्न, कोर्टाकडे पॅरोलसाठी घेतली धाव

    मुंबई, 07 ऑगस्ट : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमचा लग्नासाठी पॅरोल मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज करण्यात आला आहे. लग्नासाठी मला ४५ दिवसांसाठी पॅरोल देण्यात यावी अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या कौसर बहारशी अबूलला लग्न करायचंय आहे. कोकण विभागीय आयुक्त आणि इतर ठिकाणी अपील करुनही पॅरोल मिळाला नसल्यानं अबूने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांआधीही अबू सालेम याने तळोजा जेलला अर्ज केला होता. पण नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्याने पाठवलेल्या अर्जात त्याने लिहलं होतं की, '12 वर्ष, 3 महिने आणि 14 दिवस मी तुरुंगात आहे. त्यात मी एक दिवसही रजा घेतली नही. त्यामुळे मला आता लग्नासाठी पॅरोल मिळावा' अबू सालेमच्या या होणाऱ्या बायकोचं नाव आहे कौसर. ती 27 वर्षांची आहे. अबू सालेमचं हे तिसरं लग्न आहे. पहिलं लग्न समीराशी होऊन तलाकही झाला. त्यानं दुसरं लग्न मोनिका बेदीशी केलं असल्याची चर्चा होती. 1991मध्ये सलेमचं पहिलं लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं आहेत. ती सध्या अमेरिकेत आहेत. मोनिका बेदीबरोबरच्या त्याच्या संबंधांचीही चर्चा होती. तो सध्या मुंबई बाँबस्फोटाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. आणि आता दुसरऱ्या लग्नासाठी तो वारंवार अर्ज करत आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय यावर काय भूमिका देणार हे महत्त्वाचं आहे.
    First published:

    Tags: Abu salem, Mumbai high court

    पुढील बातम्या