Home /News /news /

सुशांत सिंह राजपूतला नाही विसरू शकत युजवेंद्र चहल, शेअर केली सगळ्यात वेदनादायक पोस्ट

सुशांत सिंह राजपूतला नाही विसरू शकत युजवेंद्र चहल, शेअर केली सगळ्यात वेदनादायक पोस्ट

सुशांतचा मृत्यू होऊन जवळपास आठवडा होत आला, परंतु आजही त्याचे चाहते आणि सिनेसृष्टी त्याला विसरू शकली नाही.

    नवी दिल्ली, 20 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)आता या जगात नाहीये. त्याचा मृत्यू होऊन जवळपास आठवडा होत आला, परंतु आजही त्याचे चाहते आणि सिनेसृष्टी त्याला विसरू शकली नाही. भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलसुद्धा (Yuzvendra Chahal) या अभिनेत्याला विसरू शकला नाही. सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच चहलला धक्का बसला. यावर त्याने सुशांतसोबतचा एका जूना फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो काढून सुशांतचा फोटो ठेवला आहे. चहल अजूनही सुशांतला विसरू शकत नाहीये आणि यावर त्याने एक एक वेदनादायक पोस्टदेखील शेअर केली आहे. जी वाचल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येईल. खरंतर, चहल सुशांतबद्दल दररोज काहीतरी पोस्ट करत असतो, पण त्याने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतच्या पाठीवर नेपोटिझम, बुली, बॉलिवूड, बॅन, शोषण, बॉयकॉटसारख्या अनेक चाकू खुपसल्याचं दिसत आहे. असं असूनही सुशांत मी ठीक आहे असं या पोस्टमध्ये लिहलं आहे. खरंतर, सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडलं आहे. सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या नंतर बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर नेपोटिझमवरून नवा वाद सुरू झाला आहे. एकीकडे अनेकांनी नेपोटिझममुळे सुशांतकडे बॉलिवूडनं दुर्लक्ष केलं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे स्वतः सुशांतचं मात्र नेपोटिझमबाबत फार वेगळं मत होतं हे पाहायला मिळत आहे. त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो नेपोटिझमवर आपलं मत मांडताना दिसत आहे. Solar Eclipse: भर दिवसा होईल अंधार! 25 वर्षानंतर सुर्यग्रहणामुळे असे दिसेल दृष्य मागच्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीतल्या काही लोकांवर असा आरोप लावला जात आहे की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या आधारावर फक्त स्टार किड्सनाच संधी दिली जाते आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आउटसायडर्ससोबत हे लोक भेदभाव करतात. असं म्हटलं जातंय की, सुशांत सुद्धा याच नेपोटिझमची शिकार झाला होता. त्यामुळे सध्या हा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे. पण यावर कोणताही उपाय निघालेला नाही. पण सुशांतनं मात्र यावर आधीच उपाय सुचवला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा सध्या सोशल मीडियावर सुशांतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहे. ज्यात त्याला नेपोटिझमवर प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर देताना तो म्हणतो. नपोटिझम फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी आहे. आपण ते बदलू शकत नाही. नेपोटिझम कायमच राहणार आहे आणि त्याचं काही होऊ शकत नाही. पण जर त्यात जाणून-बुजून खरं टॅलेंट वर येऊ दिलं नाही तर मात्र समस्या निर्माण होऊ शकते. एक दिवस असा येईल की इंडस्ट्रीचा पूर्ण ढाचाच कोसळून जाईल. जोपर्यंत त्या टॅलेंटला वाव मिळत आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. दलीत वस्ती योजना घोटाळा! भाजप आमदार आक्रमक, अधिकारी महिलेवर गंभीर आरोप संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या