स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या, संतप्त नातेवाईकांचा स्टुडिओत राडा

स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या, संतप्त नातेवाईकांचा स्टुडिओत राडा

तरुण फोटोग्राफरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

जालना, 1 ऑगस्ट: जालन्यात स्टुडिओ मालकाच्या या मानसिक छळाला कंटाळून एका तरुण फोटोग्राफरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मात्र, मृत फोटोग्राफरच्या संतप्त नातेवाईकांनी स्टुडिओत जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुभम आलूगोंडा (वय- 21) असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचा नाव आहे. शुभम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील जेबी फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होता.

हेही वाचा... विवाहित तरुणाने एकतर्फी प्रेमातून महिलेवर केले वार, पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरच

मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शुभम याने स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. आपल्याकडे काम करणाऱ्या कामगाराने स्वतः चा फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केल्याचं समजल्यानंतर जेबी स्टुडिओचे मालक जगदीश बारसे याने शुभमशी वाद घातला होता. 'तू तुझा स्वतः चा फोटोग्राफीचा व्यवसाय बंद कर, कामधंदा होत नसेल तर जा मरून जा, फाशी घे, जहर खा, अशा शब्दात जगदीश बारसे याने शुभमला धमकी दिली.  त्यानंतर त्यानं रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा...पुणे वेधशाळेत डिजिटल फलक खरेदी घोटाळा; शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकाऱ्यावर गुन्हा

जगदीश बारसे यानं दिलेल्या धमक्यामुळेच शुभम यांन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. संतप्त नातेवाईकांनी स्टुडिओत जाऊन तोडफोड केली. शुभम यास आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याप्रकरणी जेबी स्टुडिओचे मालक जगदीश बारसे, अभी ठाकूर, शिवम भवर आणि अरशद शेख या चार जणांविरोधात सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2020, 6:58 PM IST

ताज्या बातम्या