पुणे वेधशाळेत डिजिटल फलक खरेदी घोटाळा; शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकाऱ्यावर गुन्हा

पुणे वेधशाळेत डिजिटल फलक खरेदी घोटाळा; शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकाऱ्यावर गुन्हा

हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणारे डिजिटल फलकाच्या खरेदीत घोळ

  • Share this:

पुणे, 1 ऑगस्ट: भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या डिजिटल फलक खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वेधशाळेच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीच्या संचालकावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..कोरोनावर लस तयार करणाऱ्या सिरम संस्थेला शरद पवारांनी अचानक दिली भेट

वेधशाळेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.गुरफान बेग, तत्कालिन तांत्रिक अधिकारी विपिन माळी तसेच मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल गिरकर, मनीषा गिरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. या अधिकाऱ्यांर आर्थिक फसवणूक, बनावट बिले तयार करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात तपासणीसाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल झालेला वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक अधिकाऱ्याच्या घरांवर छापे टाकले होते.

काय आहे प्रकरण?

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणारे डिजिटल फलक शहरातील 12 ठिकाणी काही दिवसांपूर्वी बसवण्यात आले आहेत. मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि. कंपनीला हे डिजिटल फलक बनवण्याचं काम देण्यात आलं आहे.

हेही वाचा...जालन्यात तणाव! वीरशैव समाजानं थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात केला दफनविधी

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च अर्थात 'सफर' या योजनेंतर्गत शहरात 12 ठिकाणी डिजिटल फलक बसवण्यात आले होते. फलक बसवण्याच्या कंत्राटमघ्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआयचच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रालयाचा सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च अर्थात 'सफर' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पुण्यातील पाषाण येथील आयआयटीएमच्या माध्यमातून राबवला जात आहे.  सन 211 ते 18 या काळात या प्रोजेक्टसाठी डिजिटल फलक खरेदी आणि उभारणीच्या कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत सीबीआयनं चौकशी सुरू केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading