विवाहित तरुणाने एकतर्फी प्रेमातून महिलेवर केले वार, पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरच खुनाचा थरार

विवाहित तरुणाने एकतर्फी प्रेमातून महिलेवर केले वार, पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरच खुनाचा थरार

महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार केले.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 1 ऑगस्ट : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने महिलेचा चाकूने वार करून खून केल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरातील अजंठानगर, येथे घडली आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार केले. हल्ल्यात राणी लांडगे नामक 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर वार करणारा अरविंद गाडे (वय 30) व्यक्ती जखमी झाला आहे.

या संदर्भात चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. याबाबत राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते.

अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांक बदलला होता. त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने शनिवारी राणी यांच्यावर हल्ला केला. राणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत. त्याच्यावर पिंपरीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - सीरिअल किलर डॉक्टरची धक्कादायक कबूली, 100 लोकांना मारलं आणि मृतदेह....

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. खून, मारामाऱ्या यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठकही घेतली होती. त्यामुळे आगामी काळात गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 1, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading