सोनाली बेंद्रेला कॅन्सरमधून बाहेर काढायला ‘या’ अभिनेत्रीने केली सर्वात मोठी मदत

सोनाली बेंद्रेला कॅन्सरमधून बाहेर काढायला ‘या’ अभिनेत्रीने केली सर्वात मोठी मदत

माझी आई आणि माझ्या नवऱ्याने या कठीण प्रवासात माझी साथ कधीच सोडली नाही. मला धैर्य आणि हिंमत देण्याचं काम गोल्डी करत होता.

  • Share this:

मुंबई, 10 मे- कर्करोगाशी सुरू केलेली लढाई सोनाली बेंद्रेने जिंकली असली तरी या प्रवासात तिला अनेकांनी मदतीचे हात दिले. पण या सगळ्यात तिला मोलाची साथ दिली ती अभिनेत्री मनिषा कोईरालाने. फिक्कीच्या एफएलओने (बंगळुरू चॅप्टर) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सोनाली बोलत होती.

कर्करोगाशी सामना करताना युवराज सिंग आणि मनिषा कोईरालाकडून काही मदत मिळाली का? या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाली म्हणाली की, मनिषा स्वतः या त्रासातून गेली आहे. तिने यावर सुंदर पुस्तकही लिहिलं आहे.

मनीषाला २०१२ मध्ये गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. यावर सुमारे दोन वर्ष उपचार घेतल्यानंतर २०१४ मध्ये तिला कर्करोगमुक्त घोषित करण्यात आले.

'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण

सोनाली म्हणाली की, तिची आणि युवराज सिंगची काही भेट झाली नाही. पण, ती युवराजच्या आईला भेटली. २०११ मध्ये युवराजच्या डाव्या फुफ्फुसात कॅन्सरचा ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. यानंतर त्याने तातडीने बोस्टन आणि इंडिआनापोलिस येथे उपचार घेतले. मार्च २०१२ मध्ये त्याला हॉस्पिटमधून डिस्चार्ज देण्यात आला. २०१२ च्या एप्रिल महिन्यात तो भारतात परतला.

आता सरोगसीद्वारे बाबा होण्याचं प्लॅनिंग करतोय सलमान खान?

सोनाली म्हणाली की, ‘माझी आई आणि माझ्या नवऱ्याने या कठीण प्रवासात माझी साथ कधीच सोडली नाही. मला धैर्य आणि हिंमत देण्याचं काम गोल्डी करत होता. गोल्डीशी लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता.’ २०१८ मध्ये सोनालीला मेटास्टिक कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेण्यासाठी गेली. सहा महिने कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ती गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारतात परतली.

'माझं नाव आलिया होतं पण, सलमाननं ते बदलायला लावलं'

दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 10:54 AM IST

ताज्या बातम्या