बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल तर आता कोणीच सांगू शकत नाही. पण लग्नाआधी तो बाबा होण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान सरोगसीच्या माध्यमातून लवकरच बाबा होण्याचा विचार करत आहे.
जर सलमान असा खरंच विचार करत असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असेल यात काही शंका नाही. कारण त्याचा प्रत्येक चाहता हा सलमानच्या लग्नाची आणि त्याच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे.
सलमानच्याआधी सरोगसीद्वारे करण जोहर, तुषार कपूर, आमिर खान, शाहरुख खान, एकता कपूर, सनी लिओनी हे आई- बाप झाले आहेत.
सलमानला लहान मुलं किती आवडतात हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. अनेकदा तो आपल्या भाचे आणि पुतण्यांसोबत मजा मस्ती करताना दिसतो. एवढंच काय तर पनवेलच्या फार्महाउसवरही तो अर्पिता खानचा मुलगा आहिलसोबत दंगा करताना दिसतो.
सलमानला लहान मुलांच्या गोतावळ्यात राहायला आवडतं. त्याचं लहान मुलांसाठीचं प्रेम सिनेमांच्या सेटवरही दिसतं. एका मुलाखतीत सलमानने थट्टामस्करीत करत म्हटलं होतं की, ‘मी एक चांगला मुलगा आहे आणि मी एक चांगला बापही होऊ शकतो. पण कदाचित मी चांगला नवरा होऊ शकत नाही.’