'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण

'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण

कंगनाच्या सिनेमाची तारीख समोर आल्यानंतर हृतिकने त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली. मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्याने असं केल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं.

  • Share this:

मुंबई, 10 मे- कंगना रणौत आणि ऋतिक रोशन यांच्यातला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून दोघांनी एकमेकांबद्दल बोलणं टाळलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या वादाने तोंड वर काढलं आहे. त्यांच्यातला नवा वाद हा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून सुरू झाला आहे. त्याचं झालं असं की, कंगनाचा आगामी सिनेमा मेंटल है क्या आणि हृतिक रोशनचा सुपर ३० सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. यामुळे सोशल मीडियावर या दोन सिनेमांच्या प्रदर्शनावरून वाद सुरू झाले. या वादात कंगनाची बहीण रंगोली चंडेलनेही उडी घेतली. रंगोलीने एका मागोमाक एक ट्वीट करत हृतिकला खडेबोल सुनावले.

आता सरोगसीद्वारे बाबा होण्याचं प्लॅनिंग करतोय सलमान खान?

रंगोलीने कोणाचीही भीती न बाळगता सडेतोडपणे ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं. कंगनाचा मेंटल है क्या सिनेमा येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या सिनेमाची तारीख समोर आल्यानंतर हृतिकने त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली. मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्याने असं केल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं. यानंतर सुरू झालं ते ट्विटर वॉर...

'माझं नाव आलिया होतं पण, सलमाननं ते बदलायला लावलं'

रंगोलीने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘एका व्यक्तिकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते, जो युद्धात समोर येण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसतो.’ एवढंच बोलून रंगोली थांबली नाही ती पुढे म्हणाली की, ‘बालाजी काय कंगना रणौतचं प्रोडक्शन हाउस आहे का की जेव्हा वाटलं तेव्हा सिनेमा प्रदर्शित करायला. पण पप्पू तर पप्पूच असतो. कॉमन सेन्सच नाहीये. आता तू पाहा तुझी काय हालत होते....’

यानंतर रंगोलीने अजून एक ट्वीट करत म्हटलं की, ‘तू तुझ्या स्वस्तातल्या पीआरकडून ट्वीट करवून घेतोस आणि ती एक मुलाखत देते आणि तू चारी मुंड्या चीत...’ कंगनाची बहीण सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. ती दररोज काही ना काही ट्विटरवर शेअर करत असते.

रात्रीस खेळ चाले : काशीचा शेवट जवळ येत चाललाय कारण...

बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता पुरुषाच्याच प्रेमात ?

तिने नुकतंच एक ट्वीट केलं होतं, त्यात तिने स्पष्ट म्हटलं की, ‘कंगनाने एकता कपूरला मेंटल है क्या सिनेमा २६ जुलैला प्रदर्शित न करण्याबद्दल सांगितले. पण हा पूर्णपणे एकताचा निर्णय होता. एक निर्माती म्हणून सिनेमा कोणत्या दिवशी प्रदर्शित करायचा याचा निर्णय निर्माताच घेतो. यानंतर एकता तिचा लहानपणीचा मित्र हृतिकला भेटली आणि दोघांनी मिळून हा निर्णय घेतला.’

दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

First published: May 10, 2019, 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading