'माझं नाव आलिया होतं पण, सलमाननं ते बदलायला लावलं'

'माझं नाव आलिया होतं पण, सलमाननं ते बदलायला लावलं'

कियाराचं खरं नाव हे आलिया असून सलमान खाननं ते बदलल्याचं तिनं 'फीट अप विद द स्टार्स सीजन 2'च्या एका एपिसोडमध्ये सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 9 मे : 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग'मुळे खूप चर्चेत आहे. पण नुकताच कियारानं तिच्या खऱ्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे. कियाराचं खरं नाव हे आलिया असून सलमान खाननं ते बदलून कियारा असं केल्याचं तिनं 'फीट अप विद द स्टार्स सीजन 2'च्या एका एपिसोडमध्ये सांगितलं.

कियारा म्हणाली आलिया माझं फर्स्ट नेम आहे. पण आलिया भटमुळे सलमाननं मला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला. कारण बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन अभिनेत्री असू शकत नाहीत. कियारा पुढे म्हणाली, नाव बदलण्याचा सल्ला सलमाननं दिला असला तरीही कियारा हे नावं मी स्वतः निवडलं. आता माझे आई-वडीलही मला कियारा म्हणूनच हाक मारतात.

 

View this post on Instagram

 

One for Instagram 📸 styled by @lakshmilehr @makeupbylekha @bbhiral

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

'फीट अप विद द स्टार्स सीजन 2'मध्ये कियाराला लस्ट स्टोरी मध्ये तिला ऑडिशन न देता तिला कसं कास्ट करण्यात आलं याविषयी विचारलं असता, ती म्हणाली, 'याचं सर्व श्रेय करण जोहरला जातं. कारण तो एक परफॉर्मरची निवड करतो आणि त्याला माहित असतं की तो परफॉर्मनंस कशाप्रकारे व्हायला हवा. जेव्हा मी या सिनेमातील व्हायब्रेटर सीन शूट करत होते त्यावेळी करण मला म्हणाला की याला कार्टून बनवू नको. हा एक मजेशीर सीन आहे. मात्र त्याला कॉमेडी बनवू नको.'

2014 मध्ये फुगली सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या कियारानं आतापर्यंत 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'मशीन', 'लस्ट स्टोरीज', 'कलंक' आणि 'भारत आने नेनु', 'विनया विधेया रामा' यांसारख्या तेलगु सिनेमात काम केलं आहे. सध्या तिच्याकडे 'गुड न्यूज', 'कबीर सिंह', 'शेरशाह' आणि 'कंचना'चा रिमेक हे सिनेमे आहेत.

मागच्या 7 वर्षात कॅनडाला न गेल्याचं अक्षय कुमारचं विधान खोटं? काय सांगतात सोशल मीडियावरील 'हे' फोटो

पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसली राखी सावंत, चाहते म्हणाले गद्दार

First published: May 9, 2019, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading