Home /News /crime /

संशयामुळे प्रेमाचं नातं कधी दिसलंच नाही, मुलांच्या डोळ्यांदेखत हैवानासारखी केली पत्नीची हत्या

संशयामुळे प्रेमाचं नातं कधी दिसलंच नाही, मुलांच्या डोळ्यांदेखत हैवानासारखी केली पत्नीची हत्या

निर्दयी पतीने आधी पत्नीला लाटण्याने मारलं त्यानंतर त्याने तिला उचललं आणि जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे.

    नवी दिल्ली, 19 मे : नवरा-बायकोच्या नात्यामध्ये संशयाने जागा घेतली आणि त्यातून गुन्हा घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. पती पत्नीच्या वादाचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी पतीने आधी पत्नीला लाटण्याने मारलं त्यानंतर त्याने तिला उचललं आणि जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. या सगळ्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती फक्त मारहाणीवरच थांबला नाही तर आरोपीने तिचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. सयमा असं मृत पत्नीचं नाव आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सयमाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी जीटीबी रुग्णालयाच्या पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती आफताबचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. आनंदाने झेलण्यासाठी वर फेकलेलं बाळ थेट फरशीवर आदळलं, जागीच सोडला जीव मिळालेल्या माहितीनुसार, सयमा आपल्या कुटुंबासमवेत हर्ष विहारमधील सबोली इथं भाड्याच्या घरात राहत होती. पहिला पती बबलूपासून तिला चार मुलं होती. बबलूचा एका अपघातात मृत्यू झाला. यानंतर दीड वर्षापूर्वी सयमाने आफताब नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं. आफताब मजूर म्हणून काम करायचा. बबलूच्या निधनानंतर, भरपाई म्हणून लाखो रुपये समयाला मिळाले होते. त्यामुळेच आफताबने तिच्याशी लग्न केलं. लग्न झाल्यापासून आफताब आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघेही यावर रोज भांडण करायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. रविवारी दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य घरी उपस्थित होते. दरम्यान, आफताबने सयमाशी भांडण सुरू केलं. असा आरोप केला जातो की, आफताबने लहान मुलांसमोर सयमाला वाईट प्रकारे मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर आरोपींनी तिला उचलून खाली आपटलं. समया बेशुद्ध झाल्यावर आरोपीनं तिचा गळा आवळून खून केला. मुलाला कोरोना, कुटुंब क्वारंटाईन केल्याने वडिलांचा मृत्यू, शेवटचा फोन केला आणि.. आफताबने ज्यावेळी हा गुन्हा केला होता त्यावेळी पहिल्या पत्नीचा मुलगा सोहेल आणि सलमान घरी होते. दोन्ही भावांनी वडिलांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने काही ऐकलं नाही. मुलं ओरडत राहिली परंतु त्याने ऐकलं नाही. आपल्या पत्नीवर सतत त्याने मारहाण केली. एकदा रागाच्या भरात आफताबने आपला मुलगा सोहेललाही उचलून आपटलं. पलंगावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाली नाही. जेव्हा आईचं ओरडणं बंद झालं, तेव्हा त्याने मोठ्याने रडण्यास सुरूवात केली आणि शेजारचे घरात आले. घटनेची माहिती पोलिसांना दिली तेव्हा आफताब घटनास्थळावरून पळून गेला. घरी जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, एसटी आणि ट्रकच्या भीषण धडकेत 3 जागीच ठार संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या