गडचिरोली, 19 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील एकमेव असलेल्या ग्रीन झोनमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा आणि चामोर्शी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील 10 ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. पोलिसांनी ही ठिकाणे सील केली असून, नागरिकांचे आवागमन बंद करण्यात आले आहे. हेही वाचा - निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे…,राहुल गांधींवरील टीकेवरून सेनेचा भाजपवर घणाघात आज संस्थात्मक विलगीकरणात असलेले कुरखेडा तालुक्यातील 4 व चामोर्शी तालुक्यातील 1 असे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली. प्रशासनानेही कठोर पावले उचलत निर्बंध आणखी कडक केले. याचाच एक भाग म्हणून कुरखेडा शहरातील शासकीय मुलांचे वसतीगृह परिसर, शासकीय मुलींचे वसतीगृह परिसर, गांधीवॉर्ड, येंगलखेडा हे संपूर्ण गाव, नेहारपायली हे संपूर्ण गाव, चिचेवाडा हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. **हेही वाचा -** फक्त 12 दिवसात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद, असा वाढला कोरोनाचा ग्राफ शिवाय चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा परिसर आणि लगतचा निवासी भाग, मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर गावच्या उत्तरेकडे सुखदेव प्रल्हाद व शेखर गोविंदा मंडल यांच्या घराजवळचा परिसर, विश्वनाथनगर येथील दक्षिणकेडे संतोष राजन सरकार व नवीन नित्यानंद सरकार यांच्या घराजवळचा परिसर तसंच विश्वनाथनगर येथील पूर्वेकडे दीपक दत्ता व जोदुनाथ राजन मिस्त्री यांच्या घराजवळचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या परिसरात नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.