Home /News /news /

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे 5 अपडेट

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे 5 अपडेट

बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ कोणत्याही मानसिक तणावाखाली नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे..

पुढे वाचा ...
    मुंबई, 02 सप्टेंबर: बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घतला आह. सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर रुग्णालयात असून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला आह. जाणून घ्या या प्रकरणातील महत्त्वाचे 5 अपडेट: >> सिद्धार्थ शुक्ला याला गुरुवारी सकाळी छातीत दुखत असल्यामुळे कूपर रुग्णालयात (Mumbai's Cooper Hospital) दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर असे समजले होते की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. कूपर रुग्णालयात आणण्यापूर्वीच सकाळी साधारण 9.25  वाजता त्याचा मृत्यू झाला होता. कूपर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही बाह्य जखम (External Injury) आढळून आलेली नाही. >>मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि पोस्ट मॉर्टम अहवाल आल्यानंतर तसंच सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवल्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. हे वाचा-Fake: सिद्धार्थचा शेवटचा VIDEO म्हणून VIRAL होत असलेली क्लिप खोटी! >> सिद्धार्थच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केला नाही आहे. त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही शंका किंवा संशयास्पद मृत्यू झाला असावा असं कुटुंबातील कोणत्याही सदस्याने म्हटलेलं नाही आहे. सिद्धार्थ कोणत्याही मानसिक तणावाखाली देखील नव्हता, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. >> सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू आहे. कूपर रुग्णालयात सर्वात आधी डॉक्टर शिव कुमार यांनी सर्वात आधी सिद्धार्थला पाहिले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर डॉक्टर निरंजन यांनी सिद्धार्थचा मृतदेह तपासला. डॉक्टर निरंजन सिद्धार्थच्या मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम करणार आहेत. हे वाचा-रुग्णालयात आणल्यानंतर कशी होती सिद्धार्थची अवस्था?हॉस्पिटलकडून महत्त्वाची माहिती >> ओशिवारा पोलिसांची टीम सिद्धार्थच्या घरी पोहोचली आहे. दरम्यान सिद्धार्थची बहिण आणि तिचा नवरा रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांची टीम आणि एसआरपीएफची तुकडी कूपर रुग्णालयात पोहोचली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Siddharth shukla

    पुढील बातम्या