जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Fake: सिद्धार्थचा शेवटचा VIDEO म्हणून VIRAL होत असलेली क्लिप खोटी!

Fake: सिद्धार्थचा शेवटचा VIDEO म्हणून VIRAL होत असलेली क्लिप खोटी!

Fake: सिद्धार्थचा शेवटचा VIDEO म्हणून VIRAL होत असलेली क्लिप खोटी!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक एक्झिटने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक एक्झिटने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला आहे. मात्र तत्पूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. आणि हा व्हिडीओ सिद्धार्थचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. पाहूया काय आहे नेमकं सत्य.

जाहिरात

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूब्द्द्ल हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या चाहते शेयर करत आहेत. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडीओ सिद्धार्थचा शेवटचा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जिममधून बाहेर येऊन जिन्याच्या पायऱ्यांवर बसते. आणि त्याला अस्वस्थ वाटू लागतं. तो आपल्या छातीजवळ हात नेव्हून छातीवर हात फिरवत असतो. आणि नंतर अचानक खाली कोसळतो. असां हा व्हायरल व्हिडीओ आहे. (हे वाचा: सिद्धार्थ शुक्लाने शेवटची पोस्ट करत यांचे मानले होते आभार ) मात्र अनेक मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ फेक असून त्याच्यावर अजिबात विश्वास न ठेवण्याचं म्हटलं आहे. तसेच अशा फेक पोस्ट न करण्याचं आवाहनदेखील दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मात्र हा सिद्धार्थचाचं असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाहीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात