जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रुग्णालयात आणल्यानंतर कशी होती Sidharth Shukla ची अवस्था? कूपर हॉस्पिटलकडून महत्त्वाची माहिती

रुग्णालयात आणल्यानंतर कशी होती Sidharth Shukla ची अवस्था? कूपर हॉस्पिटलकडून महत्त्वाची माहिती

रुग्णालयात आणल्यानंतर कशी होती Sidharth Shukla ची अवस्था? कूपर हॉस्पिटलकडून महत्त्वाची माहिती

अगदी कमी वयातच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचे चाहते, सहकलाकार, मनोरंजन विश्व एवढंच काय तर माध्यमांसाठी देखील ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर: अगदी कमी वयातच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला काळाच्या (Sidharth Shukla died) पडद्याआड गेला आहे. त्याचे चाहते, सहकलाकार, मनोरंजन विश्व एवढंच काय तर माध्यमांसाठी देखील ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla Died of Heart Attack) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. बुधवारी रात्री त्याने कोणती तरी गोळी घेऊन तो झोपला होता असल्याची माहिती काही मीडिया अहवालात देण्यात आली आहे.

जाहिरात

अशी माहिती समोर आली आहे की, सिद्धार्थ शुक्ला याला गुरुवारी सकाळी छातीत दुखत असल्यामुळे कूपर रुग्णालयात (Mumbai’s Cooper Hospital) दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर असे समजले होते की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. कूपर रुग्णालयात आणण्यापूर्वीच सकाळी साधारण 9.25  वाजता त्याचा मृत्यू झाला होता. कूपर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही बाह्य जखम (External Injury) आढळून आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसा पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. मेडिकल अहवाल आणि पोस्ट मॉर्टम अहवाल समोर येईल आणि त्याचप्रमाणे त्याच्यासह राहणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बिग-बॉस13 मध्ये विजेता झाल्यानंतर सिद्धार्थला एक खास स्टारडम मिळालं होतं. त्याची फॅन फॉलोइंग लाखोंच्या संख्येने वाढली होती. त्याची आणि शेहनाझ गिल या दोघांची मैत्री चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. त्यामुळे सिद्धार्थचं असं अचानक निघून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावरील अनेकांनी त्याच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात