मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'त्या' एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोनाची भीती, नागपूरकरांमुळे तुकाराम मुंढेंही झाले हैराण

'त्या' एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोनाची भीती, नागपूरकरांमुळे तुकाराम मुंढेंही झाले हैराण

नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले

नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले

नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले

नागपूर, 26 एप्रिल :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या त्या एक रुग्णामुळे 235 च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना आवाहन केलं आहे. नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच एका रुग्णामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.  त्यामुळे पालिकेच्या वतीने  तेथील 30 घरांमध्ये राहणा-या 150 च्या वर नागरिकांना ‍विलगीकरण कक्षात पाठविले आहे. परंतु, लोकं याबद्दल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे, अशी अडचण तुकाराम मुंढे यांनी बोलून दाखवली आहे. हेही वाचा - महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बातमी, पोलिसाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर! त्यामुळे नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. नागरिकांनी लपून बसण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपला उपचार करुन घ्यावा. ज्या ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाईल जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. जर कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचा उपचार केला जाईल. तरी नागरिकांनी समोर येऊन मनपाच्या चमूला सहकार्य करावे, असंही मुंढे म्हणाले. हेही वाचा - पुण्यात पुन्हा वाढली कोरोनाबाधितांची संख्या, 6 महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर तसंच, लोकांनी माहिती लपवली किंवा सहकार्य करण्यात अडथळा आणला आणि जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल असा इशाराही  तुकाराम मुंढे यांनी दिला. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Tukaram mundhe

पुढील बातम्या