हैदराबाद, 26 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं घरापासून दूर कामासाठी आलेले असंख्य मजूर शहरात अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी आता एक खाकी वर्दीतला देवदूत आला आहे. हिमाचल प्रदेशच्या ललित कुमार हा सध्या लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये अडकला आहे. त्याची तब्येत अचानक बिघडली, पण रुग्णालयात जायला पैसे नसल्यामुळं तो तसाच विव्हळत राहिला. अखेर त्याच्या मित्रांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसाना संपर्क केल्यानंतर कुकतपल्ली पोलीस ठाण्याचे निरक्षण आणि स्टेशन हाऊस अधिकारी बी. एल. लक्ष्मीनारायण रेड्डी यांनी ललितला त्वरित रुग्णालयात दाखल केले. एवढेच नाही तर, रेड्डी यांनी स्वत:च्या खिशातून रुग्णालयाचे बिलही भरले. यासाठी पोलीस विभाग तसेच हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केलं. वाचा- आता कोरोनासमोर झुकायचं नाही, त्याला झुकवायचं! हा PHOTO पाहून वाढेल तुमचं मनोबल
Your Concern beyond Humanity towards Mr. Lalit who got stranded due to #LockDown really deserves this appreciation.
— DGP TELANGANA POLICE (@TelanganaDGP) April 23, 2020
Admitting him at hospital & supporting financially on your own, proves once again that, police is there to reach every needy.
Proud of you Dear SHO Kukatpally. pic.twitter.com/Ay7Vs8O3zr
वाचा- लॉकडाऊनमध्ये चिमुकलीचा पहिला बर्थडे पोलिसाने बनवला खास, पाहा VIDEO बंगळुरू मिरर या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 16 एप्रिल रोजी पोलीस निरिक्षक बी. एल. लक्ष्मीनारायण रेड्डी यांनी सायबराबादच्या आय़ुक्तांकडून एक सूचना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ललिलची मदत केली. ललितला अचानक अपेंडिक्सचा त्रास झाला. त्याच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते, त्यामुळं तो रुग्णालयात जाण्यासाठी तयार नव्हता. मात्र रेड्डी यांनी मी सगळा खर्च करतो, असे सांगून त्याला रुग्णालयात दाखल केले. वाचा- … आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL
त्यानंतर ललितच्या डिस्चार्जच्या दिवशी ते रेड़्डी स्वत: उपस्थित होते. पोलीस निरिक्षक रेड्डी यांनी स्वत:च्या खिशातून 25 हजार रुपयांचे बिल भरले. दरम्यान रेड्डी यांच्या कामाची दखल घेऊन हिमाचलचे मुख्यमंत्री जय कुमार ठाकूर यांनी पत्र लिहित त्यांचे कौतुक केले. या पत्रामध्ये, “तुमच्या कामाचे कौतुक आहे. कोव्हिड-19च्या युद्धात तुमचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे”, असे म्हंटले आहे. एवढेच नाही तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनीही रेड्डी यांचे कौतुक केले.