नवी मुंबई, 17 जुलै: मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला आहे. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभम राजेंद्र खातू (वय-25, न्यू पनवेल, भगतवाडी) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कालच क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट येणार आहे.
हेही वाचा... पुण्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात, नातेवाईक अशी घेतात आरोपींची भेट
मिळालेली माहिती अशी की, आरोपी आणि पीडित महिला दोघे ही नवी मुंबईतील राहणारे आहेत. नवी मुंबई महापालिकेचे कोरोना रुग्णांना पनवेल येथील कॉरंटाइन करण्यात आलं आहे. पनवेल तालुका पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कोरोना संशयित असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.
A 40-year-old woman raped at a quarantine centre in Navi Mumbai last night. She is #COVID19 positive. Case registered: Police Officer Ashok Rajput, Panvel Police Station. #Maharashtra
आरोपीचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर पनवेल तालुका पोलिस त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई करतील, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू
एखादी महिला कोरोनाविरुद्ध लढा देत असेल आणि त्याचवेळी तिच्यावर अतिप्रसंग होत असेल तर याला जबाबदार कोण, प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.