महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू

महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 जून : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. रोज कोरोनाचे नवे आकडे समोर येत आहेत. अशात कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. अशात पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये पुन्हा लोकडाऊन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्याच वेळात या बाबतचा निर्णय येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यासंबंधी निर्णय जाहीर करतील. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा लोकडाऊन होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 640 कोरोना रुग्ण असून कोल्हापुरात 10 दिवसांच्या लोकडाऊनची शक्यता असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूरमधील लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांवर काही निर्बंध घालण्यात येण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्रात कुठल्या भागात आहे कडक लॉकडाऊन?

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 17, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या