मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /धक्कादायक ! मृत्यूनंतर महिलेला दुसरा डोस, आरोग्य यंत्रणेकडून मृतकाच्या कुटुबियांची थट्टा?

धक्कादायक ! मृत्यूनंतर महिलेला दुसरा डोस, आरोग्य यंत्रणेकडून मृतकाच्या कुटुबियांची थट्टा?

नंदुरबारमध्ये (Nandurbar) एक विचित्रप्रकार समोर आला आहे. एका मृतक महिलेला मृत्यूनंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस (Second Dose) देण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये (Nandurbar) एक विचित्रप्रकार समोर आला आहे. एका मृतक महिलेला मृत्यूनंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस (Second Dose) देण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये (Nandurbar) एक विचित्रप्रकार समोर आला आहे. एका मृतक महिलेला मृत्यूनंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस (Second Dose) देण्यात आला आहे.

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 29 नोव्हेंबर : नंदुरबारच्या (Nandurbar) आरोग्य यंत्रणेने (Health Department) एक-दोन नव्हे तर मृत्यूच्या तब्बल आठ महिन्यांनतर एका महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर (Navapur) तालुक्यातील जयाबेन हरिशचंद्र पारेख यांच्या कुटुंबीयांसमवेत सदरचा प्रकार झाला आहे. नवापूर शहरात सोने चांदीचा व्यापारी असलेल्या या कुटुंबातील जयाबेन पारेख यांनी 17 मार्च 2021 रोजी लसीचा पहिला डोस (first dose) घेतला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. त्यांना उपचारासाठी गुजरातच्या सुरतला (Surat) हलवले होते. पण उपचारादरम्यान जयाबेन यांचा 7 एप्रिल 2021 रोजी गुजरातमध्ये मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर आता दोन दिवसांपूर्वी त्यांनी ज्या नोंदणीकृत मोबाईलवरुन पहिला डोस घेतला होता. त्याच मोबाईल क्रमांकावर त्यांना दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आल्याचा धक्कादायक मेसेज प्राप्त झालाय. याबाबत शहानिशा करण्यासाठी मृतक जयाबेन यांचा मुलगा मेहुल पारेख यांनी या मोबाईल क्रमांकावर जावून त्यांचे प्रमाणपत्र काढले असता त्यातही त्यांना 27 नोव्हेंबरला लस देण्यात आल्याची माहिती नमूद करण्यात आलेली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने पारेख कुटुंबीयांची थेट थट्टाच केल्याचा प्रकार उघड होत आहे.

हेही वाचा : राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन ज्याआधारे केलं तो नियम 256 काय आहे?

आरोग्य यंत्रणेची नेमकी भूमिका काय?

या साऱ्या प्रकाराने पारेख कुटुंबीय पुरतं हादरलं असतांनाच आरोग्ययंत्रना मात्रा हा सारा प्रकार नजरचुकीने झाला असल्याचा अजब गजब दावा करत आहे. विशेष म्हणज राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार नाव सर्वात अग्रक्रमावर आहे. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने हा सारा खटाटोप तर केला नाही ना? असा काहीसा प्रश्न समोर येत आहे.

हेही वाचा : 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा सरकारने काढला जीआर, अशी आहे नियमावली

नंदुरबारमध्ये आतापर्यंत किती लसीकरण?

नंदुरबार जिल्ह्यात 8 लाख 72 हजार 776 नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण 61.67 टक्के इतके आहे. मात्र दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण या तुलनेत निम्मच असून फक्त 31 .26 टक्के नागरीकांनी म्हणजेच 4 लाख 43 हजार 975 नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या देखील कमी असल्याने दुसऱ्या डोसची पूर्तता करण्यासाठी ही सारी उठाठेप नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, शासन दरबारी काहीही होवू शकते याचीच प्रचिती या साऱ्या प्रकारानंतर समोर आली असून मृतक व्यक्तीचे लसीकरण करण्याचा पराक्रम देखील नंदुरबार मधल्या आरोग्य यंत्रणेने करुन दाखवला हे खरे!

First published:
top videos