Home /News /mumbai /

School reopen : 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा सरकारने काढला जीआर, अशी आहे नियमावली

School reopen : 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा सरकारने काढला जीआर, अशी आहे नियमावली

पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे.

पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे.

पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाचा (Corona Virus) नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळल्यानंतर शाळा सुरू होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. पण, अखेर राज्य सरकारने अध्यादेश काढून 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करणारच असल्याचं स्पष्ट केले आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर  शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे.  पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे. एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावे आणि एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, अशी सूचना देण्यात आली आहे. दोन भारतीयांमुळे न्यूझीलंडला लॉटरी, मुंबईकरामुळे विलियमसनची टीम अजिंक्य! तसंच,ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार आहे.  विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना करण्यात आली आहे.   शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झालेले असणे बंधनकारक असणार आहे.  विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अशी आहे नियमावली  - एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत - एका बाकावर एकच विद्यार्थी असावा - दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे - शिक्षकांची सोय त्याच गावात त्याच शहरात राहण्याची करावी - गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये - वर्ग आळीपाळीने म्हणजे काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी असे करावे - विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना - शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले असणे बंधनकारक - विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी - स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक - बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी - सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार - ३ ते ४ तासच शाळा भरणार - मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी - विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक - घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे - जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार - पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या