तुम्ही 1962 सालात का रांगताय? पवारांच्या वक्तव्यानंतर 'सामना'तून शहांना टोला

तुम्ही 1962 सालात का रांगताय? पवारांच्या वक्तव्यानंतर 'सामना'तून शहांना टोला

चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो.

  • Share this:

मुंबई, 30 जून : भारत आणि चीन सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. चीनने केलेल्या कुरापत्यामुळे देशभरात तीव्र संताप उमटला आहे. काँग्रेसने चीन प्रश्न पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तर भाजपने काँग्रेसचा चीनशी कसा असा संबंध आहे, असा पलटवार केला आहे. या वादावर शिवसेनेनं आपल्या मुख्यपत्रातून 'चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच' असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून चीन प्रश्नावर 'ट्यून बदला हो!' या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

‘कोरोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी.  सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे.चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. ' असा टोला भाजपला लगावण्यात आला.

पुत्रप्राप्तीसाठी महिलेसोबत अघोरी प्रकार, पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच' अशी आठवणही  सेनेनं करून दिली.

‘‘हिंदुस्थानच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले आहे.’’  पंतप्रधान जे बोलले ते बरोबर आहे. चीनचे नाव न घेता पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या शंकेचे निरसन केले आहे. त्याच वेळी ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कोरोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकणार आहे,’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शहा यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी या दोन्ही लढायांवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्ष काय आदळआपट करीत आहे त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये.' असा सल्लावजा टोला अमित शहांना लगावण्यात आला.

धक्कादायक VIDEO आला समोर! TikTok असा चोरतो तुमचा डेटा

‘चीनच्या मुद्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही. 1962 पासून हिंदुस्थान-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार आहोत,’ असे गृहमंत्री शहा यांनी जाहीर केले. खरे म्हणजे, 1962 पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? विसरा तो भूतकाळ. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी 1962 साली चुका केल्या असतीलही, तुम्ही 1962 सालात का रांगताय? आता 2020 उजाडून जग पुढे गेले आहे.' असा टोलाही अमित शहांना लगावण्यात आला.

First published: June 30, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading