Home /News /technology /

धक्कादायक VIDEO आला समोर! TikTok असा चोरतो तुमचा डेटा

धक्कादायक VIDEO आला समोर! TikTok असा चोरतो तुमचा डेटा

सुरक्षेच्या कारणास्तव आता भारतात टिकटॉकवर (TikTok) बंदी घालण्यात आली आहे.

    मुंबई, 29 जून : टिकटॉक (Tiktok) हे प्रत्येकाच्या पसंतीचं अ‍ॅप. आजकाल प्रत्येक जण हे अ‍ॅप वापरत आहे. मात्र आता भारतात या  अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक हे चिनी अ‍ॅप आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टिकटॉकसह 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकमुळे प्रायव्हेसी धोक्यात असल्याचा मुद्दा वारंवार समोर आला होता. तेव्हा टिकटॉकने आपण युझर्सचा डाटा घेणं बंद करू असं सांगितलं होतं. मात्र अद्यापही टिकटॉकने तसं केललं नाही. टिकटॉकदेखील कसा मोबाइलमधील पर्सनल डाटा चोरतो याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. अ‍ॅपलच्या iOS 14 या प्रायव्हसी फिचरमुळे टिकटॉकचं हे खरं रूप समोर आलं आहे. हे एक असं फिचर आहे, ज्यामुळे एखादं अ‍ॅप तुमची परवानगी न घेता तुमच्या मोबाइलमधील माहिती घेत असल्यास समजतं. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. जे काही क्लिपबोर्डवर टाइप केलं जात आहे ते टिकटॉक आपोआप कॉपी करत आहे. यासाठी युझर्सची कोणतीही परवानगी घेतली जात नाही आहे आणि हा खूप मोठा धोका आहे. हे वाचा - आली कोरोना स्पेशल एक सीटर स्कूटर,, जाणून घ्या किंमत दरम्यान टेलिग्राफ यूकेशी बोलताना टिकटॉकने हे आपलं अँटिस्पॅम फिचर असल्याचं सांगितलं आहे. तसंच युझर्सचा डाटा घेणं बंद करू असं आश्वासन पुन्हा टिकटॉकने दिलं आहे. हे वाचा - आता गुगलच स्वत: delete करणार तुमचा डेटा, आलं आहे हे नवीन फिचर फक्त टिकटॉकच नाही तर असे बरेच अ‍ॅप आहेत जे तुमचा डाटा चोरी करतात. iOS 14 मध्ये अशा अ‍ॅपची पोलखोल होते आहे. असे किती अ‍ॅप तुमच्या परवानगीशिवाय तुमचा डाटा घेतात ते समजतं आहे. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Lifestyle, Spam chat, Technology, Tiktok

    पुढील बातम्या