Home /News /news /

जीव भांड्यात! शिवसेना मंत्र्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह मात्र पत्नी पॉझिटिव्ह

जीव भांड्यात! शिवसेना मंत्र्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह मात्र पत्नी पॉझिटिव्ह

शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गावच चिंतेत होतं.

शिर्डी, 19 जुलै: शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गावच चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा.. जुन्ररमधून राष्ट्रवादीला दु:खद धक्का, कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद पाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. शंकरराव गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील आमदार आहेत. गडाख यांचं गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून परसरात तपासणी करण्यात येत आहे. सोनई 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट जाहीर... सोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण गाव सध्या 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता. हेही वाचा... कोरोनाबाधितांना औषधं देण्यासाठी रोबोंची नेमणूक, या हॉस्पीटलची भन्नाट कल्पना दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर पुण्यात पुढील उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात सगळ्यात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत. त्याच प्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोरोनावर मात केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Shiv sena minister

पुढील बातम्या