कोरोनाबाधितांना औषधं देण्यासाठी रोबोंची नेमणूक, या हॉस्पीटलची भन्नाट कल्पना
गुजरातच्या बडोद्यामधील सर सयाजीराव गायकवाड हॉस्पीटल (SSG Hospital) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांना औषध देण्यासाठी दोन रोबो नेमण्यात आले आहेत.
बडोदा, 19 जुलै : गुजरातच्या बडोद्यामधील सर सयाजीराव गायकवाड हॉस्पीटल (SSG Hospital) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. कारणही तसंच आहे, या हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना औषध देण्यासाठी खास सेवा पुरवण्यात येत आहे. ती म्हणजे या रुग्णालयात कोरोना रुग्णांना औषध देण्यासाठी दोन रोबो नेमण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ही सेवा देण्यात येत आहे. कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना जेवण आणि औषधं देण्याचे काम हे रोबो करतात.
Gujarat: Two robots have been deployed at Sir Sayajirao Gaekwad (SSG) Hospital in Vadodara to serve food and medicine to #COVID19 patients, as a precautionary measure to mitigate the risk of infection to the hospital staff. (17.07.20) pic.twitter.com/ag5FoIiOFD
दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेने हे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर त्यानंतर हे हॉस्पीटल चर्चेचा विषय बनले आहे. अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत कारण त्यांना ही कल्पना आवडली आहे. ही सुविधा देशातील अधिकतर रुग्णालयांमध्ये होणे गरजेचे आहे अंशी प्रतिक्रिया काही युजरनी या फोटोंवर दिली आहे. हे रोबो हॉस्पीटलमधील रुग्णांना औषधे पुरवताना दिसत आहेत. त्यामुळे हॉस्पीटल कर्मचाऱ्यांचे काम काही प्रमाणात हलके झाले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका देखील काही प्रमाणात कमी झाला आहे. एका फोटोमध्ये तर हे रोबो रुग्णांना त्यांच्या बेडपर्यंत जाऊन औषधं देताना दिसत आहेत. याचाच अर्थ हे रोबो हाताळण्यासही सहज आहेत.