'डरते तो वो है...' मोदींचे शब्द वापरत अमृता फडणवीस यांचा VIDEO, गाणं नव्हे नवं वाद्य

'डरते तो वो है...' मोदींचे शब्द वापरत अमृता फडणवीस यांचा VIDEO, गाणं नव्हे नवं वाद्य

'व्हॅलेंटाईन डे'ला आपलं नवं गाणं पोस्ट केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई,20 फेब्रुवारी:'व्हॅलेंटाईन डे'ला आपलं नवं गाणं पोस्ट केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी आता चक्क पौराणिक वाद्य वाजवत नवं ट्वीट केलं आहे. 'डरते तो वो है जो अपनी छवि के लिए मरते है! मैं तो हिंदुस्तान की छवि के लिए मरता हूँ , इसी लिए किसी से भी नहीं डरता हूँ!- आदरणीय पंतप्रधान श्री' असंही अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Trying my hand at some music in #HunarHaat...असं म्हणत रिट्वीट केलं आहे.

अमृता यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेला त्यांचं नव गाणं लॉन्च केलं आहे. अमृता यांनी गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अमृता यांचं नवं गाणं इंग्रजीक आहे. 'हॅलो' असं या गाण्याचं नाव असून ते 'लिओनेल रिची' याचं हे मूळ गाणं आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्हाला माहीत असेलच की, अमृता यांचे गायनाचं प्रेम सर्वश्रृत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं. नंतर त्या आपल्या 'हॅलो' या इंग्रजी गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

अशा दिल्या होत्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा..

अमृता यांनी 'अंधाराला अंधार नाही तर केवळ प्रकाश संपवू शकतो आणि रागाला राग संपवू शकत नाही फक्त प्रेम संपवू शकतं', असं व्हिडिओला कॅप्शन देऊन त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अमृता यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरून त्यांना अनेकांनी ट्रोल केले तर काहींनी त्यांचं गोड कौतुकही देखील केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 01:57 PM IST

ताज्या बातम्या