मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /फेक न्यूज खरी ठरली, शिंदे गटाला मिळणार रिक्षा? तब्बल 6 पर्याय पाठवले

फेक न्यूज खरी ठरली, शिंदे गटाला मिळणार रिक्षा? तब्बल 6 पर्याय पाठवले

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव  पाठवला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये पक्षचिन्हावरून जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेनेला मशाल पक्षचिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अजूनही पक्षचिन्ह मिळालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिंदे गटाला रिक्षा चिन्ह मिळणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. अखेर शिंदे गटाकडून आज शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं निवडणूक आयोगाकडे सादर केल्याी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल केले. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले.

आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव  पाठवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांऐवजी नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केली आहे. तसंच, सूर्य,  ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड या देखील चिन्हाचा प्रस्ताव दिला आहे.

('त्या थडग्यावर तुमची नातवंडेही...', शिवसेनेची शिंदे गटावर जळजळीत टीका)

याआधी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

(नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?)

दरम्यान, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा स्वत:चा फोटोही शेअर केला.

First published:

Tags: Cm eknath shinde, Election commission, Marathi news