जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?

नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?

नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?

ठाकरे गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल चिन्हाचे आणि शिवसेनेचे जुने नाते आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावे दिली आहेत. तसेच ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिले आहे. ठाकरे गटाचं नाव आणि चिन्ह काय - निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत. दरम्यान, ठाकरे गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल चिन्हाचे आणि शिवसेनेचे जुने नाते आहे. शिवसेना आणि मशालीचे जुने नाते काय? आधी शिवसेना नोंदणीकृत पक्ष नव्हता त्यामुळे शिवसेनेला 1989 मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. त्याआधी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणून व्हायची. तर 1985 साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदारसुद्धा मशाल याच चिन्हावर निवडून आला होता, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. हेही वाचा -  ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकर पेटून उठल्या; गाण्यातून खुलं चॅलेंज, पाहा Video शिवसेनेने कोणत्या चिन्हांचा वापर केलाय - तसेच 1989 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे हेसुद्धा मशाल चिन्हावर खासदार झाले होते. शिवसेनेने यापूर्वी ढाल, तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात