मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेअर बाजार उघडताच धडाम, सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण

शेअर बाजार उघडताच धडाम, सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण

मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 879.68 अंकांनी घसरून , 30,768.32 वर बंद झाला तर निफ्टीही लाल निशाणीवर आहे.

मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 879.68 अंकांनी घसरून , 30,768.32 वर बंद झाला तर निफ्टीही लाल निशाणीवर आहे.

मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 879.68 अंकांनी घसरून , 30,768.32 वर बंद झाला तर निफ्टीही लाल निशाणीवर आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 21 एप्रिल : सोमवारी अमेरिकन बाजारात झालेली घसरण आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाचा परिणाम आता शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार लाल निशाण्यावर उघडलं. मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 879.68 अंकांनी घसरून , 30,768.32 वर बंद झाला तर निफ्टीही लाल निशाणीवर आहे. सकाळी 9 वाजता सेन्सेक्स 2.63 टक्क्यांनी खाली म्हणजेच 831.05 अंकांनी 30,816.95 वर बंद झाला. निफ्टी 240 अंकांनी घसरून 9019 पातळीवर आला.

ट्रेडिंग आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात अस्थिरता वाढली. सेन्सेक्स 467.47 अंकांच्या उडीसह 32,056.19 वर उघडला आणि संध्याकाळी केवळ 56.39 अंकांच्या वाढीसह 31,645.11 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी दिवसभरातील व्यापारात 9,390.85 च्या पातळीवरून 9,230.80 वर आला आहे. अखेर 4.90 अंशांच्या घसरणीसह तो 9,261.85च्या पातळीवर बंद झाला.

परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1336 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 18601 पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 590 वर पोहोचला आहे. कोरोना विषाणूच्या एकूण 18601 प्रकरणांपैकी 14759 सक्रिय प्रकरणे आहेत.

राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला कोरोना, तब्बल 125 कुटुंबांना केलं क्वारंटाईन

याव्यतिरिक्त, 3522 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक 232 जणांचा मृत्यू झाला. आता या साथीने बळी पडलेल्यांची संख्या 5470 झाली आहे.

कोरोना संकटात इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, काय आहे दर?

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Corona, Share market