नवी दिल्ली, 21 एप्रिल : संपूर्ण देशात पसरणारा कोरोना आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रपती भवनात कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकूण आरोग्य मंत्रालयाने 125 कुटुंबांना सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एखाद्या भागात कोरोनाचा एकाही रुग्ण आढळल्यास, खबरदारी म्हणून संपूर्ण प्रदेशातील लोकांना सगळ्यांपासून वेगळं विलिगीकरणात ठेवणं आवश्यक आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन पाळला असतानाही कोरोनाचा फैलाव काही थांबत नाही आहे.
कोरोनाने भारतात हाहाकार पसरवला. येथे या विषाणूचा सामना करण्यासाठी दिलासा देणारी बातमी देताना सरकारने सोमवारी सांगितले की, आता देशात रुग्णांचे दुप्पट होण्याचे प्रमाण 7.5 दिवसांपर्यंत खाली आले आहे आणि पंधरवड्यात 15 जिल्ह्यांमधील कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आले नाही. दरम्यान, काही राज्यांनी अर्थव्यवस्थेचे नुकसान रोखण्यासाठी लॉकडाउनवरील काही बंधने शिथिल करण्याची घोषणा केली आहे, तर तामिळनाडू, कर्नाटकसह दिल्लीनेही 3 मेपर्यंत कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेऊन कठोर निर्बंध सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले.
...तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा
तेलंगणा राज्याने लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. पंजाबने यापूर्वी 3 मेपर्यंत कोणत्याही प्रकारची शिथिलता नाकारली होती, परंतु आता असे म्हटले आहे की उच्च-जोखीम नियंत्रण क्षेत्राव्यतिरिक्त काही ठिकाणी औद्योगिक उपक्रम सुरू होऊ शकतात. बंदची पहिली पायरी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि गोव्यासह काही राज्यांतील निवडक ठिकाणी देण्यात आली आहे.
बर्याच राज्यात संसर्ग होण्याचे प्रकार अजूनही वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रविवार ते सोमवार दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1553 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 15 टक्के रुग्णांची तब्येत सुधारली आहेत. कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पलीकडे गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा आकडा 18601 इतका आहे.
देशात 18,000 वर पोहोचली कोरोना रुग्णांची संख्या, आतापर्यंत 590 मृत्यू
या व्यतिरिक्त 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रूग्णांची संख्या 17656 होती. त्याच वेळी, तोपर्यंत 559 लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मागील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये 1336 रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. तर दिलासादायक बातमी अशी की उपचारानंतर 3252 लोक बरे झाले आहेत. निरोगी लोकांची संख्याही सतत वाढत आहे.
कोरोना संकटात इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, काय आहे दर?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona