मुंबई 05 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 3-4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवार थेट शिर्डीला जाणार आहे. शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही, कार्यक्रम रद्द करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात हेलिकॉप्टरने शरद पवार शिर्डी येथे जातील. यासाठी ते सकाळी आठ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून निघणार असून सकाळी ९ वाजता रेसकोर्सवरुन टेकऑफ करतील. शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी लावण्यासाठी पवार रुग्णालयातून थेट शिर्डीला जाणार आहेत. शरद पवार शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला संबोधन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहे. पक्षाचं शिबिर संपल्यानंतर पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट - शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व कार्यक्रम रद्द करुन शरद पवारांच्या भेटीला रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाणे आणि मुंबईत काही कार्यक्रम होते. मात्र, ते सर्व रद्द करुन पवारांच्या भेटीला रुग्णालयात पोहचले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे अभ्यास शिबीर शिर्डी येथे सुरू झाले आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी सुरू झाला. प्रकृती ठीक नसल्याने पवार या शिबीराला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाही. मात्र, व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता आज ते प्रत्यक्षात याठिकाणी जाणार आहेत.