जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / SBI Alert! ATM मधून पैसे काढण्याआधी वाचा बँकेचा नवा नियम, होईल मोठा फायदा

SBI Alert! ATM मधून पैसे काढण्याआधी वाचा बँकेचा नवा नियम, होईल मोठा फायदा

SBI Alert! ATM मधून पैसे काढण्याआधी वाचा बँकेचा नवा नियम, होईल मोठा फायदा

SBI ने आपल्या ग्राहकांना एटीएमसंबंधी (ATM) महत्त्वाची सूचना दिली आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास OTP टाकणं गरजेचं आहे. असं न केल्यास फ्रॉड होण्याचा धोका असल्याचं SBI ने म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 मार्च : SBI ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. ऑनलाइन ट्रान्झेक्शन करताना ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राइमच्या (Cyber Crime) अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात SBI ने आपल्या ग्राहकांना एटीएमसंबंधी (ATM) महत्त्वाची सूचना दिली आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास OTP टाकणं गरजेचं आहे. असं न केल्यास फ्रॉड होण्याचा धोका असल्याचं SBI ने म्हटलं आहे.

हे वाचा -  Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान ‘या’ चुका टाळा

काय आहे नियम? SBI ने 1 जानेवारी 2022 पासून ATM ट्रान्झेक्शन अधिक सुरक्षित करण्यासाठी OTP बेस्ड ट्रान्झेक्शन सुरू केलं आहे. ATM Card द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI आपल्या ग्राहकांना OTP बेस्ड एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देतं. या सुविधेमुळे ग्राहक ज्यावेळी ATM मधून पैसे काढतील, त्यावेळी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मेसेज येईल. हा मेसेज म्हणजे ऑथेंटिकेशनचा आधार असतो. OTP द्वारे 10000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढता येतील. याबाबत SBI ने ट्विट केलं आहे.

हे वाचा -  Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील

कसं काम करेल OTP बेस्ड ट्रान्झेक्शन - - सर्वात आधी ग्राहकांना रजिस्टर्ड नंबरवर OTP पाठवला जाईल. - ग्राहक या OTP द्वारे ATM मधून पैसे काढू शकतात. - OTP 4 अंकी असेल, याद्वारे एकदा ट्रान्झेक्शन करता येईल.

हे वाचा -  या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का?

OTP बेस्ड एटीएममुळे ग्राहकांचं अनऑथराइज्ड एटीएम, ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव होण्यास मदत होईल. दरम्यान, देशात बँकिंग फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सर्वात पहिल्या नंबरवर आहे. 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत बँकिंग फ्रॉडच्या 642 घटना समोर आल्या. कोटक महिंद्रा बँकेनंतर बँकिंग फ्रॉडमध्ये आयसीआयसीआय बँक (Bank Fraud In ICICI Bank) दुसऱ्या क्रमांकावर आणि इंटसइंड बँक (Bank Fraud In IndusInd Bank) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात