Home /News /money /

Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील?

Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील?

Aadhar card

Aadhar card

अनेक वेळा आधार बनवताना अनेक माहिती चुकीची टाकली जाते किंवा ती अपूर्ण असते. यामुळे आधार कार्ड वापरताना तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आधारमध्ये सर्व माहिती पूर्ण करणे आवश्यक आहे.

    मुंबई 18 मार्च : आधार कार्ड (Aadhar Card) आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधार कार्ड हे इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे आहे कारण त्यात नागरिकांची बायोमेट्रिक माहिती (Biometric Information) नोंदवली जाते. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आधार बनवताना अनेक माहिती चुकीची टाकली जाते किंवा ती अपूर्ण असते. यामुळे आधार कार्ड वापरताना तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आधारमध्ये सर्व माहिती पूर्ण करणे आवश्यक आहे. UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, लिंग इत्यादी माहिती बदलण्याची सुविधा प्रदान करते. परंतु, यातील काही महत्त्वाचे घटक पुन्हा पुन्हा बदलता येत नाहीत. चला, जाणून घ्या कोणते अपडेट तुम्ही किती वेळा करू शकता. कमी पगार असल्याने कर्मचाऱ्याने लढवली अजब शक्कल; केलं असं काम की HR ही शॉक दोनदा नाव बदलू शकता आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर ती करू शकते. नाव बदलणे UIDAI ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केले जाऊ शकते. पण, आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल. लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; गिफ्ट केली 5 कोटींची लक्झरी कार लिंग फक्त एकदाच बदलते अनेक आधार कार्ड बनवताना लिंग चुकीच्या पद्धतीने टाकले जाते. UIDAI च्या नियमांनुसार ते बदलले जाऊ शकते. तुम्हाला आधार कार्डमध्ये जेंडर अपडेट करण्याची फक्त एक संधी मिळेल. जन्मतारीख बदलण्याची फक्त एक संधी UIDAI ने बनवलेल्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आधार कार्डमध्ये चुकीची जन्मतारीख टाकली असेल तर ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते. त्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत. ही माहिती कधीही बदला तुम्ही तुमच्या घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन आधारमध्ये वारंवार अपडेट करू शकता. त्यांना अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, UIDAI

    पुढील बातम्या