मुंबईत गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

मनसेसैनिकांनी गनिमी कावा पद्धतीने लोकल स्टेशन गाठले. जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. अखेर पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन यशस्वी केले आहे. मनसेसैनिकांनी गनिमी कावा पद्धतीने लोकल स्टेशन गाठले. जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली. त्यानंतर पुढे लोकलने प्रवास पूर्ण केला.

यादरम्यान, संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकांना त्रास होतो. त्यासाठी आमची मागणी लोकल सेवा सगळ्यांना द्यावी अशी आहे. सरकार मात्र आम्हालाच नोटीस आणि पोलीस दंडुका दाखवत आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने चर्चा करावी' अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं बाळ

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली होती.

मनसेच्या आंदोलनाला डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा, रेल्वे सुरू करा अन्यथा...!

लोकल सेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना एसटी बस किंवा खासगी गाड्याने प्रवास करावा लागत आहे. ठाणे, वसई, विरार, डोंबिवली, बदालपूर, अंबरनाथ भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना मुंबईत यावे लागते. पण लोकल सेवा बंद असल्यामुळे चार-चार तासांचा प्रवास करून बसने प्रवास करून ऑफिस गाठावे लागत आहे.

मराठा समाज पुन्हा पेटला, टायर पेटवून पंढरपूर-पुणे मार्ग रोखतानाचा आक्रमक VIDEO

काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाच नसल्यामुळे चाकरमान्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. परंतु, मुंबईतील लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 21, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading