पंढरपूर, 21 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे. मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर समाज संतप्त झाला आहे. आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पंढरपूरमध्ये मराठा समाज आक्रमक pic.twitter.com/dJGFVsnxtH
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) September 21, 2020
गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं बाळ माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पध्दतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. कोल्हापुरातही आज पुन्हा मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन करत राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज बारावा दिवस आहे. सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार आहे.