मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा, रेल्वे सुरू करा अन्यथा...!

मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा, रेल्वे सुरू करा अन्यथा...!

रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा बहाल करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मनसेप्रमाणे मुंबई डबेवाला असोशिएशनला लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल अशा शब्दात सरकारला इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेनं सविनय आंदोलन पुकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोशिएशनने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही पाठिंबा दिल आहे. अनेक ऑफिसं सुरू झाली असल्यामुळे डबे पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी डेबेवाल्यांनीही केली होती.

इतकंच नाही तर मनसेने डबेवाल्यांच्या मागणीला उचलून घेतल्यामुळे मनसेचे आभारही डबेवाल्यांकडून मानण्यात आले आहेत. दोन महीन्या पूर्वी मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की लोकल सेवा बहाल करा अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून डबेवाल्याला लोकलने प्रवास करू देण्यात यावा. परंतु, दोन महिने झाले तरी रेल्वे प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही.

मराठा समाज पुन्हा पेटला, टायर पेटवून पंढरपूर-पुणे मार्ग रोखतानाचा आक्रमक VIDEO

ना लोकल सेवा बहाल केली ना डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक मानून लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. मुंबई हळूहळू पुर्व पदावर येत आहे. काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. ज्या कार्यालयात शक्य आहे तिथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तोपर्यंत डबेवाला आपली सेवा पुर्ण क्षमतेने देऊ शकत नाही.

गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं बाळ

रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा बहाल करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मनसेप्रमाणे मुंबई डबेवाला असोशिएशनला लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल अशा शब्दात सरकारला इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकार आणी रेल्वे प्रशासनाने आमची अडचण समजून घ्यावी व डबेवाल्यांची सेवा आत्यावश्क सेवा मानून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 21, 2020, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading