मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Big News : संभाजीराजे छत्रपती यांची हेरगिरी! ट्विट करत म्हटले यातून काय साध्य होणार?

Big News : संभाजीराजे छत्रपती यांची हेरगिरी! ट्विट करत म्हटले यातून काय साध्य होणार?

 संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता.

संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता.

Sambhajiraje Chhatrapati spying allegation

    सिंधुदुर्ग, 31 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात पेटत चाललेला वाद आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी गंभीर आरोप (Serious Allegation) केले आहेत. संभाजीराजे यांनी त्यांची हेरगिरी होत असल्याचा आरोप (spying allegation) केला आहे. पण माझी हेरगिरी करून काहीही साध्य होणार नाही, असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे. हेरगिरी कोण करतंय याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी त्यांचा राज्य सरकारवर संशय असल्याची चर्चा सुरू झालीय. (वाचा-बाळ रडेपर्यंत आईही दूध पाजत नाही, मग आरक्षणासाठीही लढावंच लागेल-नरेंद्र पाटील) सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांना भेटत त्यांनी समाजासाठी एकत्र येण्याची विनंती केली आहे. केंद्रातील भाजप आणि राज्यातली महाविकास आघाडी दोन्ही सरकारने एकमेकांकडे बोटं न दाखवता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं त्यांनी म्हटलं होतं. संभाजीराजे यांच्यावर यानंतर काही जणांनी टीकाही केली. पण आता त्यांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ माजली आहे. (वाचा-बंडोपाध्यायांना मी असंच कसं जावू देईन; मुख्य सचिवांसाठी ममतांची नवी चाल) संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी दुपारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी त्यांची हेरगिरी होत असल्याचा थेट आरोप केला आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. आता हेरगिरी कोण करत आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र त्याचं हे ट्विट राज्य सरकारकडे बोट दाखवणारं असल्याचं बोललं जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोना योद्धा बनून रस्त्यावर उतरा असा सल्ला दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संभाजीराजे यांनी तुम्ही मराठा समाजाच्या पाच गोष्टी पूर्ण करा मी लगदेच कोरोना योद्धा बनून रस्त्यावर उतरलतो, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्याचवेळी मी समाजाचा योद्धा असून सरकारला 6 जूनपर्यंतची मुदतही दिली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Serious allegation

    पुढील बातम्या