जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / बाळ रडेपर्यंत आईही दूध पाजत नाही, त्यामुळं आरक्षणासाठी लढावंच लागेल, नरेंद्र पाटलांचा इशारा

बाळ रडेपर्यंत आईही दूध पाजत नाही, त्यामुळं आरक्षणासाठी लढावंच लागेल, नरेंद्र पाटलांचा इशारा

बाळ रडेपर्यंत आईही दूध पाजत नाही, त्यामुळं आरक्षणासाठी लढावंच लागेल, नरेंद्र पाटलांचा इशारा

Narendra Patil on Maratha Reservation राज्यातील मराठा संघटनांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मुकमोर्चे काढावे लागतील असंही पाटील म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलडाणा, 31 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्य सरकारवर आता मोठ्या प्रमाणावर टीका होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या इच्छाशक्तीच्या अभावी मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्यामुळं हे आरक्षण रद्द झालं, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वाचा- पुण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल; नियमात केले मोठे बदल, महापौरांची घोषणा ) बुलडाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. जोपर्यंत बाळ रडत नसतं, तोपर्यंत आईदेखिल त्याला दुध पाजत नाही. त्यामुलं जोपर्यंत मराठा समाजा मोर्चे, आंदोलनं करणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असं वक्तव्या नरेंद्र पाटील यांनी केलं. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय योग्य पद्धतीनं हाताळण्यात आला नाही. त्यामुळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. वर्षभर प्रकरण चाललं त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी या प्रकरणाला स्थगिती मिळाली आणि 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द झाले. आरक्षण रद्द झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर होत आहे. त्यामुळं वस्तुस्थिती नागरिकांसमोर यावी म्हणून भाजपनं समिती स्थापन केली आहे. त्याद्वारे राज्यात सध्या जनजागृती केली जात आहे. (वाचा- पुणेकरांसाठी Good News! गेल्या 24 तासांत दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या ) पुन्हा मूकमोर्चे काढावे लागतील गायकवाड समितीचा अहवाल महायुती सरकारनं ग्राह्य धरला होता. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन करुन मराठा समाजातील तरुणांना 2 हजार कोटींचं कर्जवाटप केलं. पण महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांपासून महामंडळाला निधीच दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी समाजाच्या पाठीशी आहे. राज्यातील मराठा संघटनांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मुकमोर्चे काढावे लागतील असंही पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात