Home /News /news /

पुण्यातून आली मोठी बातमी! सलून चालकांसाठी आयुक्तांनी काढला महत्त्वाचा आदेश

पुण्यातून आली मोठी बातमी! सलून चालकांसाठी आयुक्तांनी काढला महत्त्वाचा आदेश

पुणे शहरात अनलॉकच्या प्रक्रियेत काही नियम आणखी शिथिल करण्यात आले आहे.

पुणे, 27 जून: पुणे शहरात अनलॉकच्या प्रक्रियेत काही नियम आणखी शिथिल करण्यात आले आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सलून आणि ब्युटीपार्लर सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आदेश जारी केला आहे. सलूनमध्ये अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकांना सेवा देणं बंधनकारक आहे. सलूनमध्ये फक्त कटिंग तर ब्युटीपार्लरमध्ये केस कटिंग करण्यास मूभा असेल. कलरिंग व्हॅक्सिंग आणि आयब्रो थ्रेडिंगला परवानगी आहे. मात्र, स्किन ट्रिटमेंटला परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सलून आणि ब्युटीपार्लर चालवताना ग्राहक आणि सेवक दोघांनाही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केलेल्या आदेशात म्हणलं आहे. हेही वाचा.. कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये सलूनला सशर्त परवानगी दिली आहे. सलून दुकाने, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर चालू ठेवता येणार आहेत. 28 जून पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. नियम व अटी पाळणं बंधनकारक... -सलून, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल. -दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. -ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा - सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. -फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल. -उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी. -राज्यातील उर्वरित भागांमध्ये सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. हेही वाचा.. ऐकावं ते नवलच...! गावठी दारूचा हातपंप पाहून पोलिस अधिकारी देखील चक्रावले काय आहेत राज्य सरकारचे नियम? मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात सलून, आणि ब्युटी पार्लर 28 जूनपासून सुरु करता येतील. केवळ केस कापता येतील, दाढी करता येणार नाही. मात्र या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील आणि त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे सलून आणि ब्युटीपार्लर चालवताना ग्राहक आणि सेवक दोघांनाही मास्क वापरणं बंधनकारक आहे.
First published:

Tags: Corona, Corona virus, Coronavirus, Maharashtra news, Pune news

पुढील बातम्या