ऐकावं ते नवलच...! गावठी दारूचा हातपंप पाहून पोलिस अधिकारी देखील चक्रावले

ऐकावं ते नवलच...! गावठी दारूचा हातपंप पाहून पोलिस अधिकारी देखील चक्रावले

जालन्यात पाण्याच्या हातपंपांची काहीच कमी नाही आहे. पण, जालन्यात गावठी दारूचा हातपंपही आहे, हे तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.

  • Share this:

जालना, 27 जून: पाणीटंचाई जणू काय जालनेकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे जालन्यात पाण्याच्या हातपंपांची काहीच कमी नाही आहे. पण, जालन्यात गावठी दारूचा हातपंपही आहे, हे तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे सत्य आहे. जालना पोलिसांच्या दारूबंदी पथकाने केलेल्या छापेमारी हे समोर आलं आहे. लोहार मोहल्ल्यात असलेला गावठी दारूचाच हातपंप पाहून आता तर पोलिसही चक्रावले आहेत.

हेही वाचा...कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

शहरातील लोहार मोहल्ला परिसरात लपून-छपून गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती जालना पोलिसांच्या दारूबंदी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, सय्यद उस्मान,रामेशवर बघाटे, आर.टी. वेलदोडे, सुरेश राठोड, राम पेव्हरे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव अलका केंद्रे, रत्नमाला एडके आणि धोंडीराम मोरे यांनी लोहार लोहल्ल्यात छापेमारी केली. परंतु पोलिसांना तिथे काहीच आढळून आलं नाही. दरम्यान घराच्या एका खोलीतील फरशीवर त्यांना छोटा हातपंप दिसला. दरम्यान, पोलिसांनी तेथे तपासणी केली असता त्या फरशीखाली दारूचा हौद असून हातपंपाच्या साह्याने दारू बाहेर काढून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक उघडकीस आला. भूमिगत दारूचा हौद आणि हातपंप पाहून पोलिस अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत.

हेही वाचा...नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी

पोलिसांच्या या कारवाईत सुमारे 93 हजारांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये आरोपी बबन गायकवाड याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: June 27, 2020, 4:32 PM IST

ताज्या बातम्या