मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /VIDEO : 'बेडरूममध्ये धोनी असला तरी...', पहिल्यांदाच साक्षीनं केला खुलासा

VIDEO : 'बेडरूममध्ये धोनी असला तरी...', पहिल्यांदाच साक्षीनं केला खुलासा

इन्स्टाग्रामवर लाइव्ह दरम्यान धोनीबाबत साक्षीचा सर्वात मोठा खुलासा, बेडरूममध्ये या कामात असतो व्यस्त.

इन्स्टाग्रामवर लाइव्ह दरम्यान धोनीबाबत साक्षीचा सर्वात मोठा खुलासा, बेडरूममध्ये या कामात असतो व्यस्त.

इन्स्टाग्रामवर लाइव्ह दरम्यान धोनीबाबत साक्षीचा सर्वात मोठा खुलासा, बेडरूममध्ये या कामात असतो व्यस्त.

नवी दिल्ली, 01 जून : भारताचा स्टार खेळाडू आणि माजी फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सोशल मीडियापासून दूर असतो. मात्र त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊनमध्ये साक्षी चाहत्यांसाठी धोनीचे व्हिडीओ शेअर करत असते. रविवारी (31 मे) रोजी साक्षी पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली. यावेळी साक्षीनं धोनीबाबत काही प्रश्नांची उत्तर देत पोलखोल केली.

यावेळी साक्षीनं सांगितले की, लॉकडाऊनमध्ये (Lockdown) धोनी मॅकेनिक झाला आहे. आपल्या सात बाईकसोबत काही ना काही करत असतो. एवढेच नाही तर धोनीचे व्हिडीओ गेम प्रति असलेल्या प्रेमाबाबतही यावेळी साक्षीनं सांगितले. साक्षी म्हणाली की, 'धोनीचं डोकं सतत काही ना काही विचारात असतं. व्हिडीओ गेम हा एक पर्याय आहे तणाव कमी करण्याचा. त्यामुळं धोनी बेडरुममध्ये असला तरी व्हिडीओ गेम खेळण्यात व्यस्त असतो. पण त्याचा तणाव कमी होत असेल या विचारानं पब्जी (pubg) खेळत असला तरी मला राग येत नाही'. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #dhoniretires ट्रेंड सुरू झाला होता. त्यावेळी साक्षीनं एक ट्वीट करत सर्वांचे तोंड बंद केले होतं.

वाचा-लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 

#WhistlePodu @ruphas

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

वाचा-धोनी संपणार इंग्लंडच्या 'या' चॅम्पियन खेळाडूचं करिअर, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

धोनीच्या आयुष्यातील तीन खास प्रसंग

लाइव्हमध्ये साक्षीनं धोनीच्या आयुष्यातील तीन खास प्रसंगाबाबतही सांगितले. साक्षीनं सांगितलं की, जेव्हा धोनीला पद्मभूषण पुरस्कार मिळाला, लेफ्टिनेंट कर्नलचा सन्मान आणि अर्थात 2011 वर्ल्ड कप (World Cup) या तीन त्याच्या आयुष्यातील खास प्रसंग आहेत.

क्रिकेट धोनीसाठी सगळ्यात जवळचं

साक्षीनं यावेळी असेही सांगितले की क्रिकेटबाबत धोनी खुप भावुक आहे. साक्षीनं जिव्हाबाबत सांगितलेकी, धोनीनं जिव्हासोबत कसा वेळ घालवायचा याची सगळी तयारी केली होती. मात्र 2015 वर्ल्ड कपमुळे तो तिच्यासोबत वेळ घालवू शकला नाही. तसेच, साक्षीनं धोनीवर टीका करणाऱ्यांनाही फटकारलं.

वाचा-मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला NUDE फोटो, पतीसाठी लिहिला खास मेसेज

आयपीएलमधून कमबॅक करण्यासाठी धोनी होता सज्ज

क्रिकेट चाहत्यांप्रमाणेही दिग्गज क्रिकेटपटूही धोनीच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीनं ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता कोरोनामुळं ही स्पर्धाही 2022पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळं आता धोनीकडे आयपीएल हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. आयपीएल ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरू असली तरी लॉकडाऊननंतरही प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते.

First published:

Tags: Cricket, Sakshi dhoni