मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनी संपवू शकतो इंग्लंडच्या 'या' चॅम्पियन खेळाडूचं करिअर, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

धोनी संपवू शकतो इंग्लंडच्या 'या' चॅम्पियन खेळाडूचं करिअर, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनं (S. Sreesanth) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे वर्णन क्रिकेटचा डॉन असं केलं आहे.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनं (S. Sreesanth) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे वर्णन क्रिकेटचा डॉन असं केलं आहे.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनं (S. Sreesanth) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे वर्णन क्रिकेटचा डॉन असं केलं आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 29 मे : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनं (S. Sreesanth) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे वर्णन क्रिकेटचा डॉन असं केलं आहे. श्रीसंतनं धोनीच्या उत्कृष्ट फिटनेसविषयी बोलताना सांगितलं की, धोनी फक्त 38 वर्षांचा आहे आणि त्याला देशासाठी खेळायला आवडते. त्याचे वय हे निवृत्तीचे नाही. भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने गुरुवारी HELO अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आणि क्रिकेटबद्दल आपले विचार मांडले.

दरम्यान, मॅथ्यू हेडनबाबत, तो बाद झाल्यावर त्याने आपले हात जमिनीवर मारले होते. हे असं का केलं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर श्रीसंतनं, 'मला WWEकडून प्रेरणा मिळाली. अजून काही नव्हते. अगदी शोएब अख्तरदेखील असे करतो', असं उत्तर दिलं

वाचा-लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

'धोनी स्टोक्सची कारकीर्द संपुष्टात आणु शकतो'

श्रीसंतने गुरुवारी HELO अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये धोनीच्या निवृत्तीबाबतही विचार मांडले. यावेळी श्रीसंत म्हणाला की, धोनी अजून खूप क्रिकेट खेळणार असून त्याला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही आहे. बेन स्टोक्सने आपल्या 'ऑन फायर' या पुस्तकात धोनीवर टीका करत म्हटलं होतं की वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनी निरूत्साही दिसला होता. यावर बोलताना श्रीसंत म्हणाला की, 'बेन स्टोक्सनं धोनीला खेळताना पाहिलं नाही आहे. धोनीनं मनावर घेतलं तर स्टोक्सची कारकीर्द संपवू शकतो'. श्रीसंतनं याआधी धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.

वाचा-क्रिकेट चाहत्यांना धक्का, टी-20 वर्ल्ड कपबाबत आली मोठी बातमी

माझ्यावर बॅन नसता तर डिव्हिलियर्स 360 नसता - श्रीसंत

या लाईव्हमध्ये त्याला डिव्हिलियर्सच्या फलंदाजीबद्दल विचारले असता, तो म्हणाला की जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की कदाचित माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स 360 म्हणून ओळखला गेला नसता. कारण मी त्याला वारंवार बाद केले असते.

वाचा-भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 'तो' सामना फिक्सच, दिल्ली पोलिसांचा खुलासा

First published:

Tags: Cricket, S sreesanth