जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

कसोटीतून निवृत्त झालेल्या धोनीने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नाही मात्र टी-20 वर्ल्ड कप 2020नंतर किंव आधी धोनी निवृत्ती घेऊ शकतो.

कसोटीतून निवृत्त झालेल्या धोनीने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नाही मात्र टी-20 वर्ल्ड कप 2020नंतर किंव आधी धोनी निवृत्ती घेऊ शकतो.

बुधवारी पुन्हा एकदा ट्वीटरवर #dhoniretires ट्रेंड सुरू झाला. अचानक चाहत्यांनी धोनीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 मे : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) गेल्या एका वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. 2019मध्ये इंग्लंडमध्ये (England) झालेल्या 2019 वर्ल्ड कपमध्ये धोनीनं अखेरचा सामना खेळला होता. त्यामुळं नेहमीच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत असतात. दरम्यान, धोनीनं अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही आहे. मात्र बुधवारी पुन्हा एकदा ट्वीटरवर #dhoniretires ट्रेंड सुरू झाला. अचानक चाहत्यांनी धोनीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मात्र यासगळ्यावर धोनीची पत्नी साक्षीनं एक ट्वीट करत सर्वांचे तोंड बंद केले. सोशल मीडियावर #dhoniretires चा ट्रेंड पाहून साक्षी स्वत:ला रोखू शकली नाही. साक्षीनं ट्वीट करत, ही केवळ अफवा आहे. मला माहित आहे लॉकडाऊनमध्ये लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा शब्दात सर्वांना फटकारलं. मात्र काही वेळानंतर साक्षीनं हे ट्वीट डिलीट केले. वाचा- क्रिकेट चाहत्यांना धक्का, टी-20 वर्ल्ड कपबाबत आली मोठी बातमी

News18

दुसरीकडे धोनी आयपीएलमधून पुन्हा कमबॅक करेल अशी आशा होती. यासाठी धोनीनं सरावही करण्यास सुरुवात केली होती. मात्र कोरोनामुळं आता आयपीएल ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. वाचा- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ‘तो’ सामना फिक्सच, दिल्ली पोलिसांचा खुलासा आयपीएलमधून कमबॅक करण्यासाठी धोनी होता सज्ज क्रिकेट चाहत्यांप्रमाणेही दिग्गज क्रिकेटपटूही धोनीच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीनं ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता कोरोनामुळं ही स्पर्धाही 2022पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळं आता धोनीकडे आयपीएल हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. आयपीएल ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरू असली तरी लॉकडाऊननंतरही प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते. वाचा- भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा, लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड कारण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात