मुंबई,ता.28 जून : मुंबईतल्या गजबजलेल्या घाटकोपर परिसरात कोसळेल्या विमानानं काही वेळापूर्वीच जुहूच्या धावपट्टीवरून उड्डाण घेतलं होतं. या विमानाची पायलट महिला होती अशीही माहिती मिळाली होती. टेस्टिंग साठी हे विमान निघालं होतं मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिघाड झाल्याचं कळताच पायलटने खुल्या जागेत विमान उतरविण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे. मात्र यात पायलटचा मृत्यू झाला. सी-90 जातीचं हे विमान असून मुंबईच्या युवाय एव्हिएशनने हे विमान उत्तरप्रदेश सरकारकडून विकत घेतलं होतं अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी दिली आहे. या आधी अलाहाबादला या विमानाला अपघात झाला होता त्यानंतर डागडुज्जी करून हे विमान विकण्यात आलं होतं. 12 आसनी हे विमान असून या अपघातामुळं त्याच्या देखभालीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. काय असतील अपघाताची कारणं?
- खराब हमावामानामुळं एव्हिएशन यंत्रणेत बिघाड
- विमानाची देखभाल योग्य पद्धतीनं केली नसल्यानं यंत्रणा सदोष
- विमानात अचानक तांत्रिक बघाड झाल्यानं अपघात
- विनामाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणारमहा

)







