मुंबई, 28 जून : झिंग झिंग झिंगाट या गाण्याच्या तालावर खरंतर संपू्र्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभरातले सैराटचे चाहते थिरकले आहेत. पण सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' मध्येही हे गाणं जेव्हा नव्या शब्दांसह समोर आलं तेव्हा मात्र सैराटच्या चाहत्यांचा राग अनावर झाला.आणि हा राग सोशल मीडियावर ट्रोलिंगव्दारे समोर आला.
https://t.co/PCsTuPoOXr #Zingaat: Why My Heart Will be Wild like 'Sairaat', & Won't Just Beat Like 'Dhadak'! pic.twitter.com/qL2SnGy3mF
— The Better India (@thebetterindia) 27 June 2018
धडकच्या हिंदी झिंगाटचा ट्विटरातींनी चांगलाच समाचार घेतला.अमिताभ भट्टाचार्यने लिहिलेल्या या हिंदी गाण्याच्या ओळींवरही टीका झाली.तर जान्हवी कपूरला डान्स करता येत नाही हेही बोललं गेलं. हिंदी झिंगाटवर अनेक विनोद सुरु झाले. करण जोहरची निर्मिती असलेल्या 'धडक'वर प्रदर्शनापूर्वीच टीकेचा भडीमार मात्र धडकायला सुरुवात झालीय हे नक्की.
हेही वाचा
मॅटर्निटी लीव्ह वाढवून 6 महिने केल्यामुळे महिलांची नोकरी धोक्यात - सर्वे
मुंबईकरांनो सावधान, मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण, दोघांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay-Atul, Bollywood, Dhadak movie, Zingaat song