नवी दिल्ली, 28 जून : दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्याचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आलाय. 29 सप्टेंबर 2016ला सकाळी एलओसीवर जाऊन लष्करानं दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्धवस्त केले होते. जगभरात लष्कराच्या या कारवाईचं कौतुक झालं होतं.
हेही वाचा कार्लेखिंडीत शिवशाही बस आणि एसटीचा अपघात, चालकासह 25 प्रवासी जखमी
मुंबईकरांनो सावधान, मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण, दोघांचा मृत्यू
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज
भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसराला घेरलं होतं. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचंही समोर आलं होतं. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. पाकिस्ताननं उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2016ला हल्ला केला होता. त्याच्या 11 दिवसांनंतरच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. 29 सप्टेंबर 2016ला भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरिकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. नियंत्रण रेषेपासून 4 किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते.

)







